Marathwada Weather: मराठवाड्यात पुन्हा हवापालट, 4 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील सांगितली आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून काहीशी उघडीप देणाऱ्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज दिनांक 8 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील सांगितली आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील. तरी इथल्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.
advertisement
3/5
लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज हवामान खात्याकडून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सांगितली आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अलर्ट हा दिला गेला नाही आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर शहराला आज 8 जून रोजी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल देखील शहराला यलो अलर्ट देण्यात आला होता. शहरातील तापमान हे 34 अंशावरती गेलेले आहे.
advertisement
5/5
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पेरण्या लांबीवर पडलेल्या आहेत आणि त्यामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहेत. तसेच जे उन्हाळी पिके लावले होते त्यांना देखील पाऊस न पडल्यामुळे नुकसानीचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी खात्याने दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather: मराठवाड्यात पुन्हा हवापालट, 4 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट