Plane Crash : बारामतीनंतर जगात आणखी एक प्लेन क्रॅश; खासदारासह 15 जणांचा मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
After Baramati Colombia Plane Crash : बारामतीत अजित पवारांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यूचा धक्का सगळ्यांना बसला आहे. लोक धक्क्यातून सावरत नाहीत तोच आणखी एक धक्का बसला आहे. बारामतीनंतर जगात आणखी एक प्लेन क्रॅश झाल्याची बातमी आहे, ज्यात एका खासदाराचा मृत्यू झाला आहे.
advertisement
1/7

कोलंबियातील बीचक्राफ्ट 1900 हे विमान, ज्यात 15 जण होतं. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाने बुधवारी सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी कुकुटा इथून उड्डाण केलं पण लँडिंगच्या अवघ्या 11 मिनिटांपूर्वी एटीसीशी संपर्क तुटला.
advertisement
2/7
बुधवारी कोलंबिया-व्हेनेझुएला सीमेजवळ हे विमान बेपत्ता झालं. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी विमानाचा शोध सुरू केला.
advertisement
3/7
कोलंबियाच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी आणि सेटेना या विमान कंपनीने सांगितलं की, विमान शेवटचं कॅटाटुम्बोवर दिसलं होतं.
advertisement
4/7
त्यानुसार शोध मोहीम सुरू करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानाचे अवशेष एका दुर्गम आणि डोंगराळ भागात आढळले.
advertisement
5/7
खराब हवामान आणि खडकाळ भूप्रदेशामुळे शोधकार्यादरम्यान बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
6/7
स्थानिक माध्यमांनुसार या अपघातात विमानातील सर्व 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 कॅप्टन आणि कोलंबियन संसदेचे सदस्य आहेत.
advertisement
7/7
विमान अपघात कसा झाला, यामागील कारण आहे, याचा तपास आता कोलंबियन नागरी विमान वाहतूक संस्था करत आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Plane Crash : बारामतीनंतर जगात आणखी एक प्लेन क्रॅश; खासदारासह 15 जणांचा मृत्यू