Cleaning Tips : हिवाळा संपतोय, या पद्धतीने पॅक करून ठेवा जाडजूड ब्लँकेट्स; पुढच्या सीझनपर्यंत राहतील फ्रेश!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Blanket storage tips : हळूहळू थंडी कमी होत आहे आणि काही दिवसांतच लोक आपले रग्स आणि ब्लँकेट्स पॅक करायला सुरुवात करतील. पुढील हिवाळ्यातही ते ताजेतवाने आणि सुगंधी राहावेत, यासाठी काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही रग्स आणि ब्लँकेट्स योग्य पद्धतीने पॅक करू शकता.
advertisement
1/5

हिवाळा आता हळूहळू निरोप घेत आहे. अशा वेळी घरात वापरल्या जाणाऱ्या रग्स, ब्लँकेट्स आणि उबदार बिछान्यांची नीट काळजीपूर्वक साठवण करण्याची वेळ आली आहे. अनेकदा लोक घाईघाईत हे न धुताच किंवा स्वच्छ न करता पॅक करून ठेवतात, त्यामुळे काही महिन्यांनी बाहेर काढल्यावर दुर्गंधी, ओलसरपणाची समस्या दिसून येते. योग्य पद्धतीने साठवण केल्यास हे वर्षानुवर्षे नव्यानसारखे राहू शकतात.
advertisement
2/5
सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे उन्हात वाळवणं. रग्स आणि ब्लँकेट्स किमान 3–4 तास चांगल्या उन्हात नक्की ठेवा. उन्हामुळे त्यातील साठलेली ओल निघून जाते आणि बॅक्टेरिया तसेच जंतूही नष्ट होतात. शक्य असल्यास हलकंसं झटकून धूळ काढा. जे ब्लँकेट्स धुता येतात, ते साठवण्यापूर्वी धुवून पूर्णपणे वाळवून घ्या.
advertisement
3/5
यानंतर पॅकिंगकडे लक्ष द्या. रग्स आणि ब्लँकेट्स पूर्णपणे कोरड्या ठिकाणीच पॅक करा. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बंद केल्यास ओल अडकू शकते, त्यामुळे कापडी किंवा सूती मोठ्या बॅगचा वापर करणं अधिक चांगलं ठरतं. आजकाल व्हॅक्युम स्टोरेज बॅग्सही मिळतात, ज्यामुळे जागा कमी लागते आणि सामान सुरक्षित राहतं. पॅक करताना त्यात कडुनिंबाची पाने, कापूर किंवा लवंगाच्या काही पाकळ्या ठेवा, यामुळे किडे लागत नाहीत आणि हलका सुगंधही टिकून राहतो.
advertisement
4/5
साठवण करण्याची जागा देखील तितकीच महत्त्वाची आहे. रग्स आणि ब्लँकेट्स नेहमी कोरड्या, हवेशीर आणि उंच ठिकाणी ठेवा. थेट जमिनीच्या संपर्कात ठेवू नका, नाहीतर खालून ओल लागू शकते. लाकडी कपाट किंवा पेटीत ठेवताना आधी वर्तमानपत्र किंवा कोरडं कापड अंथरा. मधूनमधून 2-3 महिन्यांनी कपाट उघडून हवा लागेल अशी व्यवस्था करणंही फायदेशीर ठरतं.
advertisement
5/5
या छोट्या-छोट्या काळजीमुळे तुमचे हिवाळ्यातले बिछाने दीर्घकाळ सुरक्षित राहतील. पुढच्या हिवाळ्यात जेव्हा तुम्ही ते बाहेर काढाल, तेव्हा ना दुर्गंधी असेल, ना धूळ आणि ना कोणतीही खराबी. थोडीशी निगा तुमचे महागडे रग्स आणि ब्लँकेट्स वर्षानुवर्षे नव्यासारखे ठेवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cleaning Tips : हिवाळा संपतोय, या पद्धतीने पॅक करून ठेवा जाडजूड ब्लँकेट्स; पुढच्या सीझनपर्यंत राहतील फ्रेश!