TRENDING:

Border 2 : 6 दिवसांत 200 कोटी पार; पण सहाव्या दिवशी 'बॉर्डर 2'ला मोठा झटका

Last Updated:
Border 2 Collection : 'बॉर्डर 2' चित्रपटाचा एकूण प्रवास आता वेगाने ऐतिहासिक ब्लॉकबस्टर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण सहाव्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/5
Border 2 :  6 दिवसांत 200 कोटी पार; पण सहाव्या दिवशी 'बॉर्डर 2'ला मोठा झटका
सनी देओलच्या बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला ही फिल्म प्रदर्शित झाल्यानंतर 6 दिवस चित्रपटगृहांवर वर्चस्व गाजवत आहे. अवघ्या सहा दिवसांतच या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या प्रभावी कमाईसह 'बॉर्डर 2'ने 'धुरंधर'चा मागील विक्रम मोडला आहे आणि बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा आपलं स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
2/5
पण सुस्साट सुटलेल्या बॉर्डर 2 ची कमाई सहाव्या दिवसी मात्र खडली आहे. 'सॅकनिल्क'वरील माहितीनुसार, 'बॉर्डर 2'ने बुधवारी सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फक्त 13 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत कलेक्शनमध्ये घट झाली आहे.
advertisement
3/5
बॉर्डर 2 ने पहिल्या दिवशी 30 कोटी, दुसऱ्या दिवशी 36.50 कमाई केली. तिसऱ्या दिवशी रविवारी तब्बल 54.50 कोटी कमवत रेकॉर्ड केला.  खरी जादू चौथ्या दिवशी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिसली. देशभक्तीच्या वातावरणात चित्रपटाने तब्बल 59 कोटी कमावले.
advertisement
4/5
पण पाचव्या दिवशी कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली, फक्त 20 कोटींची कमाई झाली. ही घट सहाव्या दिवशीही कायम राहिली. फक्त 13 कोटींची कमाई झाली.
advertisement
5/5
पण तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या आठवड्याच्या शेवटी कामकाजाच्या दिवसांमध्ये अशी घट होणं सामान्य आहे. अवघ्या सहा दिवसांत 213 कोटींची कमाई केली आहे. या प्रभावी आकड्यासह बॉर्डर 2 अलिकडच्या काळातील सर्वात मोठ्या हिंदी हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. 200 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार हे जवळजवळ निश्चित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Border 2 : 6 दिवसांत 200 कोटी पार; पण सहाव्या दिवशी 'बॉर्डर 2'ला मोठा झटका
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल