मराठवाड्यावर दुहेरी संकट, थंडी आणि अवकाळी दोन्ही सोबतच, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं सांगितली आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगला जोर धरला होता. डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं सांगितली आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा हा 11 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. थंडीच्या जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक हे थंडी पासून बचाव करण्यासाठी आता शेकोटी देखील पेटवत आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये मराठवाड्यात अजून जास्त थंडी पडेल असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
advertisement
3/5
धाराशिव जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तरी इथल्या नागरिकांना सतर्क राहावे. त्यासोबतच आपल्या पिकांची देखील काळजी घ्यावी.
advertisement
4/5
लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत देखील किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर जालना, हिंगोली या जिल्ह्यांत किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत पुढील 3 दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
advertisement
5/5
बीडमध्ये किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यावर दुहेरी संकट, थंडी आणि अवकाळी दोन्ही सोबतच, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?