TRENDING:

Marathwada Weather Update: मराठवाड्यात अवकाळी संकट कायम, इथं बरसणार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: राज्यातून अवकाळी पावसाने माघार घेतली तरी मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5
मराठवाड्यात अवकाळी संकट कायम, इथं बरसणार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
गेल्या काही काळात मराठवाड्यातील हवामानात सतत बदल होत आहेत. डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस, थंडी, कडक ऊन आणि ढगाळ हवामान, धुकं असं विचित्र हवामान पाहायला मिळालं. आता वर्षाअखेर पुन्हा हवामानात बदल जाणवत आहेत.
advertisement
2/5
मराठवाड्यात आज रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सियसपर्यंत कमी होऊ शकते. तर दिवसभर उष्णतेचा अनुभव होईल. त्याचबरोबर तापमानात थोडा उतार-चढाव होईल. पण एकूणच तापमान सामान्य स्वरूपात राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
advertisement
3/5
हवामान विभागाच्या अहवालानुसार मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः नांदेड, परभणी, लातूर आणि संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
4/5
मराठवाड्यात वाऱ्याची गती वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशेने वाऱ्यांचा वेग 20 ते 25 किलोमीटर प्रति तास असू शकतो. या वाऱ्यामुळे पिकांची विशेषतः ऊस आणि भाजीपाला पिकांची आणि त्याचबरोबर झाडांची देखील हानी होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील तापमानात आज हलका बदल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेत हवामानातील बदलांशी जुळवून घ्यावे लागेल. तसेच सतत बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: मराठवाड्यात अवकाळी संकट कायम, इथं बरसणार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल