TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्राला आता कोल्ड वेव्हचा तडाखा, 7 जिल्ह्यांना थेट अलर्ट

Last Updated:
2 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. सामान्यापेक्षा कमी तापमान नोंदवले गेल्यास हा इशारा दिला जातो.
advertisement
1/7
महाराष्ट्राला आता कोल्ड वेव्हचा तडाखा, 7 जिल्ह्यांना थेट अलर्ट
उत्तर भारतातून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. 1 आणि 2 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. सामान्यापेक्षा कमी तापमान नोंदवले गेल्यास हा इशारा दिला जातो. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या सात जिल्ह्यांना कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. पाहुयात राज्यात हवामान कसे असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात देखील गारवा वाढला आहे. 2 डिसेंबर रोजी किमान तापमानात आणखी 1 अंशाने घट होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 31 तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूरला कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. यामुळे पुणेकरांना असामान्य गारठा जाणवेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने कोल्ड वेव्हचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या सर्व पाचही जिल्ह्यांत किमान तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअस एवढे नीचांकी राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. उर्वरित मराठवाड्यात देखील तापमान घट पहायला मिळेल.
advertisement
6/7
विदर्भात ढगाळ वातावरण असेल तर काही प्रमाणात धुके राहील. तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे असेल. नागपूर आणि अमरावतीसह संपूर्ण विदर्भात देखील गारवा जाणवेल.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात सगळीकडेच गारठा वाढणार असल्याने नागरिकांनी गरम कपडे परिधान करावे. भरपूर पाणी प्यावे. आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्राला आता कोल्ड वेव्हचा तडाखा, 7 जिल्ह्यांना थेट अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल