मराठवाड्यात थंडीची लाट, छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 10 अंश सेल्सिअस, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात थंडीचा जोर वाढणार आहे. 7 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान 10 सेल्सिअस राहील.
advertisement
1/5

राज्यात थंडीचा कडाका अनेक ठिकाणी पाहिला मिळत आहे. मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढणार आहे.
advertisement
2/5
7 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 सेल्सिअस राहील. जालनामध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहील. दिवसा सूर्यप्रकाश असला तरी सकाळी आणि रात्री गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
लातूरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. धाराशिवमध्ये 30 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान जाईल तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस असेल. या जिल्ह्यांमध्ये हवामान शेतकऱ्यांसाठी अनुकूल असून दिवसा उबदार आणि रात्री थंड हवामान राहील.
advertisement
4/5
नांदेड जिल्ह्यात सौम्य उष्णता आणि स्वच्छ हवामान राहील. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. परभणीतही हवामान मध्यम राहील. येथे तापमान 30 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. या भागात शेतकऱ्यांना कामासाठी पोषक वातावरण मिळेल.
advertisement
5/5
बीड जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस असेल तर हिंगोली जिल्ह्यात देखील हवामान निरभ्र राहण्याची शक्यता असून तापमान 30 अंश सेल्सिअस आणि 13 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या जिल्ह्यांमध्ये रात्री थंडीचं प्रमाण अधिक अनुभवता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात थंडीची लाट, छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 10 अंश सेल्सिअस, हवामान विभागाचा अलर्ट