Rubina Dilaik : प्रेग्नंट असल्याची न्यूज देऊन 24 तास उलटले नाहीत, तोच रुबिना दिलैकने दिली Good News
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rubina Dilaik Pregnancy News : अभिनेत्री रुबिना दिलैकने आपण प्रेग्नंट असल्याचं सांगत एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. अखेर त्या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
advertisement
1/7

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' ची विनर रुबीना दिलैकने आपल्या प्रेग्नन्सीची बातमी देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. रुबीनाने आपण प्रेग्नंट असल्याचं स्वत: सांगितलं. तिने तिच्या सोशल मीडियावर तसा व्हिडीओ पोस्ट केला होता.
advertisement
2/7
रुबीनानं शेअर केलेल्या व्हिडीओला तिनं एक ड्रामाटिक म्युझिक लावलं आहे. सुटकेचा श्वास सोडून तिने सांगितलं, 'मी प्रेग्नंट आहे'. पण या व्हिडीओमध्ये ती हे एकच वाक्य बोलली त्यामुळे चाहते संभ्रमात पडले. अनेकांचा यावर विश्वास बसत नव्हता.
advertisement
3/7
रुबिनाच्या या व्हिडीओला 24 तास उलट नाही तोच आता रूबिनाने नवा व्हिडीओ शेअर केला जात. ज्यात तिने प्रेग्नन्सीबाबत सविस्तर सांगितलं आहे. रुबिनाचा हा व्हिडीओ म्हणजे तिचा आगामी प्रोजेक्टचा भाग असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला आणि तो खरा ठरला आहे.
advertisement
4/7
रुबिना प्रेग्नंट महिलांसाठी एक नवीन रिअॅलिटी शो घेऊन येते आहे. ती हा शो होस्ट करणार आहे. प्रेग्नन्सीच्या शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या 3 महिन्यात असलेल्या महिला या शोमध्ये सहभागी होऊ शकतात.
advertisement
5/7
प्रेग्नंट महिलांना रिअॅलिटी सुपरस्टार बनण्याची संधी आहे. रिअॅलिटी शोचा भाग होऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी रुबिनाची ही गूड न्यूजच आहे. The Little Adda Company या युट्युब चॅनेलवर हा शो प्रसारित होणार असल्याची माहितीही रुबिनाने इन्स्टाग्राम पोस्टवर दिली आहे.
advertisement
6/7
नोव्हेंबर 2023 मध्ये रुबीनाने जुळ्या मुलींना जन्म दिला. जीवा आणि एधा अशी त्यांची नावं आहेत. रुबीना अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
advertisement
7/7
रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी 2008 मध्ये लग्न केलं. त्याआधी ते चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉस 14 मध्येही ते एकत्र दिसले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rubina Dilaik : प्रेग्नंट असल्याची न्यूज देऊन 24 तास उलटले नाहीत, तोच रुबिना दिलैकने दिली Good News