TRENDING:

Weather Update: पाऊस गेला, आता थंडीची लाट; राज्यात पारा घसरला, उद्यापासून ६ जिल्ह्यांत थंडीचा तडाका

Last Updated:
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा वाढलेला जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 10 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
पाऊस गेला, आता थंडीची लाट; राज्यात पारा घसरला, उद्यापासून ६ जिल्ह्यात थंडीचा तडा
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा वाढलेला जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 10 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 10 नोव्हेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कोरडे आणि उष्ण वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
3/7
मुंबईतील कमाल सुमारे 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात मुख्यतः निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यातील कमाल तापमान 31 अंश, सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत थंड आणि कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7

6/7
छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर शहराच्या तुलनेत थंडीचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत निरभ्र आकाश राहून वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यभरात दिवसा उन्हाची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. मात्र रात्री आणि पहाटेच्या वेळेत वातावरणात गारठा वाढल्याने नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी तूर पिकाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update: पाऊस गेला, आता थंडीची लाट; राज्यात पारा घसरला, उद्यापासून ६ जिल्ह्यांत थंडीचा तडाका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल