नाद करा पण सातारकरांचा कुठं! 15 मिनिटात पेपर, घाटात वाहतूक ठप्प; पॅराग्लायडिंग पठ्ठ्यानं गाठलं कॉलेज
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Student takes paragliding route to reach exam : साताऱ्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने परीक्षेसाठी पॅराग्लायडिंगचा मार्ग निवडला. पर्यटकांच्या गर्दीमुळे घाटातून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्याकडे वेळ कमी होता.
advertisement
1/7

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाचगणी-महाबळेश्वरला जोडणाऱ्या मार्गावरील पसारणी घाट विभागातील हॅरिसन फॉली पॉइंटवरून एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पॅराग्लायडिंगचा पर्याय निवडावा लागलाय.
advertisement
2/7
पाचगणी-महाबळेश्वर घाटावरील वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे, विशेषतः आठवड्याच्या शेवटी आणि वर्षाच्या शेवटी या भागात होणाऱ्या ट्रॉफीकमुळे एका विद्यार्थ्याला अडचणीचा सामना करावा लागला.
advertisement
3/7
पसरणी गावचा समर्थ महांगडे वाईतील किसन वीर महाविद्यालयात आहे. 15 फेब्रुवारीला पेपर होता. मात्र, त्या दिवशी तो कामानिमित्त पाचगणीला गेला. त्यावेळी एका विद्यार्थीनीने त्याला पेपर असल्याची आठवण करून दिली.
advertisement
4/7
पेपरला 15 मिनिट शिल्लक असताना घाटात लांबच्या लांब ट्राफिक होतं. त्यामुळं अर्ध्या तासात परीक्षा केंद्रावर पोहोचणं शक्य नव्हतं. गोविंद येवले यांनी त्याला पॅराग्लायडिंगद्वारे परीक्षा केंद्रावर पोहोचवण्याची तयारी दाखवली.
advertisement
5/7
प्रशिक्षित गोविंद येवले यांनी पॅराग्लायडर्ससोबत समर्थला कॉलेजच्या परिसरातील मैदानावर उतरवलं. तिथं मित्र त्याची बॅग घेऊन पोहोचला होता. पेपरला पाच मिनिटं शिल्लक असताना समर्थला वेळेवर पोहोचता आलं.
advertisement
6/7
समर्थ महांगडे हा पॅराग्लायडिंग करत परीक्षेला जात असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नाट्यमयरित्या समर्थला पेपरला पोहोचता आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, गोविंद येवले यांच्यामुळं मी परीक्षेला वेळेत पोहचू शकलो, असं म्हणत समर्थने गोविंद येवले यांचे आभार मानले. तसेच सोशल मीडियावर देखील या कृतीचं कौतूक केलं जातंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
नाद करा पण सातारकरांचा कुठं! 15 मिनिटात पेपर, घाटात वाहतूक ठप्प; पॅराग्लायडिंग पठ्ठ्यानं गाठलं कॉलेज