TRENDING:

22,00,000,00 घराच्या मालकाला कोणी घर देतं का घर? धनुभाऊंच्या महाराष्ट्रातील घरांची यादीच समोर

Last Updated:
मुंबईत राहण्यासाठी घर नाही म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची महाराष्ट्रात पुणे, मुंबई, परळीत घरे आहेत.
advertisement
1/7
22,00,000,00 घराच्या मालकाला कोणी घर देतं का घर? धनुभाऊंच्या घरांची यादी
माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना सरकारी बंगला काही सोडवेना अशीचं परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. कारण कृषीमंत्रिपदावरून पाय उतार होऊन पाच महिने उलटून गेले आहेत. पण अद्यापही त्यांनी आपला सरकारी बंगला काही सोडला नाही. मुंबईत राहण्यासाठी घर नसल्याचं कारण त्यांनी पुढे केलं आहे. पण आता एक नवी माहिती समोर आली आहे.
advertisement
2/7
मुंबईत घर नसल्याचं कारण देत सातपुडा हा सरकारी बंगला सोडण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्रात पाच घरे असून या घरांची किंमत २२ कोटींच्या आसपास आहे. पुणे, परळी, मुंबई या ठिकाणी त्यांची आलिशान घरे आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
3/7
परळीतील जलालपूर येथे २६,९०० स्के. फूटचं घर आहे. या घराची किंमत जवळपास पाच कोटीहून अधिक आहे. . हे घर धनंजय मुंडे यांच्या नावावर आहे.
advertisement
4/7
पुण्यातील शिवाजीनगर येथील द्वारका अपार्टमेंट येथे ९३० स्के. फूटचं आहे. या घराची किमंत १ कोटीहून अधिक आहे. हे घर धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नाववर आहे.
advertisement
5/7
परळीतील जलालपूर येथे जवळपास ११ हजार स्के. फूटचं घर असून त्याची किंमत साडे पाच कोटी आहे.
advertisement
6/7
पुण्यातील शिवाजीनगर येथील युगाई ग्रीन इमारतीत १५३८ स्के. फूट घर आहे. या घराची किंमत २ कोटी इतकी आहे. हे घर धनंजय मुंडे यांच्या नावावर आहे.
advertisement
7/7
मुंबईतील मलबार हिल परिसरात धनंजय मुंडेंचा वीर भवन इमारतीत 4 बेडरुमचा अलिशान फ्लॅट आहे. 2151 चौरस फूटांचा हा फ्लॅट असून 16 कोटी 50 लाख रुपयांचा हा फ्लॅट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
22,00,000,00 घराच्या मालकाला कोणी घर देतं का घर? धनुभाऊंच्या महाराष्ट्रातील घरांची यादीच समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल