हायकोर्टाने सरकारला सुनावलं, मनोज जरांगेंच्या वकिलांना सूचना; उच्च न्यायालयात खडाजंगी, काय काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
हायकोर्टाने सरकारला सुनवले असून मनोज जरांगेंच्या वकिलांनाही सूचना दिल्या आहेत कोर्टात नेमकं काय घडलं हे थोडक्यात समजून घेऊया.
advertisement
1/13

५ हजार आंदोलकांना परवानगी असताना पण जास्त आंदोलक आले, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाला दिली
advertisement
2/13
हमीपत्र देताना जरांगेंकडून अटी पालनाची हमी, आता मात्र उल्लंघन झाल्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले.
advertisement
3/13
जरांगेच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिली नाही तरी आंदोलन सुरू ठेवल्याचे बिरेंद्र सराफ यांनी सांगितले,
advertisement
4/13
शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलनकर्त्यांना ट्रकने सगळं पुरवत असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
advertisement
5/13
या आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा देखील आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
advertisement
6/13
जरांगे यांचे समर्थक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा सदावर्ते यांचा न्यायालयात खळबळजनक दावा केला आहे.
advertisement
7/13
मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सगळं घडवून आणलं जात आहे, असा युक्तिवाद सदावर्तेंनी केला.
advertisement
8/13
मराठा आंदोलकांनी संपूर्ण सीएसएमटी परिसर ब्लॉक केलाय , तुम्ही आदेश द्या, अशी मागणी सदावर्तेंनी केली.
advertisement
9/13
आता बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना थांबवा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
advertisement
10/13
मुंबईला रोखण्याचे आंदोलकांकडून प्रयत्न सुरू आहेत, कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण
advertisement
11/13
आम्हाला मनोज जरांगेंच्या प्रकृतीची काळजी असल्याचे कोर्ट म्हणाले.
advertisement
12/13
हमीपत्रावरील सही जरांगेंचीच आहे का? असा सवाल देखील कोर्टाने केला आहे.
advertisement
13/13
मराठा आंदोलकांनी मुंबई ब्लॉक केली आहे का? असा सवाल कोर्टाने केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
हायकोर्टाने सरकारला सुनावलं, मनोज जरांगेंच्या वकिलांना सूचना; उच्च न्यायालयात खडाजंगी, काय काय घडलं?