TRENDING:

Hingoli News : पोलिसांनी 12-15 लाख उकळले, तीला आणि मलाही मारलं, आकाशचा जीव घेणारा तो पोलीस कोण?

Last Updated:
Hingoli News : संबंधित पोलीस अधिकारी आणि इतर चार ते पाच जणांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. (मनीष खरात, प्रतिनिधी)
advertisement
1/7
पोलिसांनी 12-15 लाख उकळले, तीला आणि मलाही मारलं, आकाशचा जीव घेणारा तो पोलीस कोण?
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातील एका तरुणाने पोलिसांच्या त्रासाला आणि दबावाला कंटाळून स्वतःला संपवलं.
advertisement
2/7
आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडिया एप व्हॉट्सअपवर सुसाईड नोट लिहीली आहे. या नोटमध्ये त्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
3/7
ही नोट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
advertisement
4/7
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील युवकाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करून त्रास दिल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आकाश माणिकराव देशमुख असे मयत तरुणाचे नाव आहे.
advertisement
5/7
या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक मेसेज टाईप करून नातेवाईकांना पाठवला आहे.
advertisement
6/7
या मेसेजमध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करीत त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या मेसेजमध्ये इतर सहा ते 8 जणांची नावे देखील लिहिली आहेत.
advertisement
7/7
संबंधित पोलीस उपनिरीक्षकासह इतरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा तरुणाच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोचले असून या मयत तरुणावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli News : पोलिसांनी 12-15 लाख उकळले, तीला आणि मलाही मारलं, आकाशचा जीव घेणारा तो पोलीस कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल