5 वर्षांपासून एकही सिनेमा नाही, तरी कुकला देते 1 लाख पगार; फराह खानकडे एवढा पैसा येतो कुठून?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Farah Khan Net Worth : बॉलिवूडची कोरिओग्राफर, डायरेक्टर फराह खान तिच्या कुकला 1 लाख पगार देते. गेल्या 5 वर्षात तिने एकही सिनेमा केला. तिच्याकडे एवढा पैसे येतो कुठून?
advertisement
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने एक काळ गाजवला. सध्या सिनेमे सिनेमे बनवत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
advertisement
2/8
चित्रपट आणि कोरियोग्राफीपेक्षा YouTube वर अधिक सक्रिय दिसत आहे. फराहचे कुकिंग व्हिडीओ आणि त्यामध्ये तिचा कुक दिलीप यांचे व्हिडीओ ट्रेंड होत असतात. फराह आज तिचा बर्थडे सेलिब्रेट करतेय.
advertisement
3/8
फराह खान खूप श्रीमंत आहे असं सगळे म्हणतात. तिचा कुक दिलीपला ती तब्बल 1 लाख रुपये पगार देते असं म्हणतात. स्वत: दिलीपने देखील फराहने त्याचा पगार वाढवल्याचं सांगितलं होतं. दिलीपला 1 लाख रुपये पगार देणारी फराह स्वत: किती कोटींची मालकीण आहे?
advertisement
4/8
फराह खानने 2024 मध्ये स्वतःचा YouTube चॅनल सुरू केलं. त्यात तिने तिचा कुक दिलीपला सहभागी करून घेतलं. पहिल्याच व्हिडीओला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. काहीच महिन्यांत तिच्या चॅनलला YouTube कडून सिल्व्हर बटण मिळालं.
advertisement
5/8
फराह आणि दिलीप यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावते. दोघांमधील मजेशीर बोलणं आणि साध्या पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ प्रेक्षकांना आवडतात. या लोकप्रियतेमुळे फराह आणि दिलीपने अनेक ब्रँड एंडोर्समेंट्सही मिळवल्या आहेत.
advertisement
6/8
अलीकडेच सोहा अली खानच्या ‘All About Her’ या पॉडकास्टमध्ये फराह खानने आपल्या YouTube जर्नीबद्दल खुलासा केला. तिने सांगितलं की YouTube मधून होणारी कमाई चित्रपटांपेक्षा अधिक फायदेशीर ठरत आहे. OTT किंवा टीव्ही चॅनलच्या नियमांशिवाय, पूर्ण क्रिएटिव्ह फ्रीडम मिळत असल्यामुळे YouTube वर काम करणं अधिक आनंददायी वाटतं.
advertisement
7/8
फराह खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, ती अलीकडेच आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमध्ये 'गफूर' हे गाणं सादर करताना दिसली. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. दिग्दर्शनाच्या बाबतीत 2020 साली आलेला 'हॅपी न्यू ईयर' हा तिचा शेवटा सिनेमा आहे. त्यानंतर तिचा कोणताही सिनेमा आलेला नाही.
advertisement
8/8
फराह खानची एकूण नेटवर्थ सुमारे 80 ते 85 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये तिच्या चित्रपटांमधील कमाई, कोरियोग्राफी, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि आता YouTube चॅनलमधून होणाऱ्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. चित्रपटसृष्टीतून डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळणाऱ्या फराह खानचा हा प्रवास सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
5 वर्षांपासून एकही सिनेमा नाही, तरी कुकला देते 1 लाख पगार; फराह खानकडे एवढा पैसा येतो कुठून?