Jalgaon News : जळगावात मध्यरात्रीच्या सुमारास घरावर तलवारी अन् दगडांनी हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalgaon News : जळगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर तलवारी आणि दगडफेक करत हल्ला करण्यात आला. (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील धनाजी काळे नगरात राहणारे मक्तेदार विशाल वाघ यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात 15-16 हल्लेखोरांनी हल्ला केला.
advertisement
2/5
दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत दोन तलवारी आणि दगडांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकाराने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
advertisement
3/5
मक्तेदार विशाल वाघ व त्यांचे भाऊ घरी नसल्याने घटनेने धास्तावलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.
advertisement
4/5
तक्रारीवरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे.
advertisement
5/5
हल्लेखोरांनी शहरात आणखी दोन तरुणांच्या घरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण थरारक प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : जळगावात मध्यरात्रीच्या सुमारास घरावर तलवारी अन् दगडांनी हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद