Chalisgaon News : कॅफेमध्ये शालेय मुलांचे अश्लील चाळे; भाजप आमदाराची सटकली, पोलिसांसमोर तोडफोड
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Chalisgaon News : चाळीसगाव येथे कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार मंगश चव्हाण यांचा पोलिसांसमवेत छापा. (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) :
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरात खाजगी कॅफेमध्ये अश्लील चाळे चालत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
advertisement
2/7
याची कुणकुण आमदार मंगेश चव्हाण यांच्या कानापर्यंत पोहचली. त्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहरात स्टेशन रोड परिसरात अवैधपणे सुरू करण्यात आलेल्या कॅफेवर पोलिसांसमवेत कॅफेवर छापा टाकला.
advertisement
3/7
या छापादरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड केली.
advertisement
4/7
यावेळी अनाधिकृतपणे अवैध कॅफे जमीनदोस्त करण्याच्या सूचनाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत.
advertisement
5/7
सदर कॅफेमध्ये शालेय मुला-मुलींचे अश्लील चाळे सुरू होते. याबाबत खातरजमा झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
6/7
राज्यातील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारे कॅफे कल्चर आल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वीही लातूर शहरात अशाच कॅफेंवर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
7/7
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Chalisgaon News : कॅफेमध्ये शालेय मुलांचे अश्लील चाळे; भाजप आमदाराची सटकली, पोलिसांसमोर तोडफोड