Gold, silver rates : आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, हाच तो खरेदीचा क्षण
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या भावात चढ उतार सुरूच आहे. आज पुन्हा एकदा मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे.
advertisement
1/5

सुवर्णनगरी अर्थात जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या भावात चढ उतार सुरूच आहे. आज पुन्हा एकदा मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे.
advertisement
2/5
आज जाहीर झालेल्या दरानुसार सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 300 रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलो मागे तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
advertisement
3/5
चांदीच्या दरात घसरण झाली असून, चांदीचा दर 90 हजाराहून 88 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, चांदी स्वस्त झाल्यानं मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
दुसरीकडे सोन्याच्या दरामध्ये देखील प्रति तोळ्यामध्ये 300 रुपयांची घसरण झाली असून, सोन्याचे दर प्रति तोळा 71 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत.
advertisement
5/5
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदी स्वस्त झाल्यानं खरेदीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Gold, silver rates : आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, हाच तो खरेदीचा क्षण