MSRTC Bus : नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण! धावत्या एसटी बसचे मागचं चाक निखळलं अन्.. पाहा PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
MSRTC Bus : जळगाव जिल्ह्यात धावत्या बसचे मागील चाक निखळल्याने मोठा अपघात झाला असता. सुदैवाने चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला.
advertisement
1/5

मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या दुरावस्था झालेल्या अनेक बसचे व्हिडीओ समोर आले आहेत. सुदैवाने अजूनतरी यामध्ये कोणताही मोठा अपघात झाला नाही. मात्र, वेळीच याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
advertisement
2/5
जळगाव जिल्ह्यातील पाचोराहुन जळगावकडे जाणाऱ्या चालत्या बसचे मागील चाक निखळले. मात्र, ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांनी तात्काळ गाडी थांबवून रस्त्याच्या बाजूला घेतली.
advertisement
3/5
जळगाव जिल्ह्यातील शिरसोली-वावडदा रस्त्यावर हा प्रकार घडला असून प्रवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
advertisement
4/5
पाचोरा आगराची बस ही पाचोऱ्याकडून जळगावकडे जात असताना तसेच जळगावात सुरू असलेल्या शिवमहापुरान कथेच्या पार्श्वभूमीवर बसमध्ये प्रचंड गर्दी होती.
advertisement
5/5
अचानक चालत्या बसचे मागचे चाक बाहेर आल्याचा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाश्यांचे प्राण वाचले असून एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारचा फटका प्रवाश्यांना बसला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
MSRTC Bus : नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण! धावत्या एसटी बसचे मागचं चाक निखळलं अन्.. पाहा PHOTO