Sharad Pawar Convoy Accident : मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात, घटनास्थळाचे Exclusive PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Sharad Pawar Convoy Accident : शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन कार एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची घटना.
advertisement
1/5

राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक नेता पायाला भिंगरी लावून मतदारसंघाचे दौरे करत आहेत. अशात ठाकरे गटाच्या नेच्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना घडली होती.
advertisement
2/5
ही घटना ताजी असतानाच आता शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून सभा आटोपून भुसावळकडे पवार गटाचा ताफ जात असताना ही घटना घडली.
advertisement
3/5
अचानक गतिरोधक आल्याने पुढील गाडीने ब्रेक मारल्याने मागील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
4/5
या अपघातात दोन इनव्हो कारचं मोठं नुकसान झालं असून यात एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे.
advertisement
5/5
बुऱ्हाणपूर अंकलेश्र्वर महामार्गावरील वाघोदे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेनंतर नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Sharad Pawar Convoy Accident : मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात, घटनास्थळाचे Exclusive PHOTOS