TRENDING:

स्टील उद्योग ते रेशीम हब.., या 5 गोष्टींसाठी जालना आहे फेमस

Last Updated:
मराठवाड्यातील जालना हा एक प्रमुख जिल्हा आहे. या 5 गोष्टींमुळे जालना शहराची एक खास ओळख निर्माण झालीय.
advertisement
1/6
स्टील उद्योग ते रेशीम हब.., या 5 गोष्टींसाठी जालना आहे फेमस
प्रत्येक शहराची विशिष्ट अशी ओळख असते. आपल्याकडे खाद्यसंस्कृती, पेहराव, जीवनमान इत्यादी अनेक बाबतीत विविधता आढळते. अनेकदा यावरून देखील शहराची ओळख होत असते. आजही नागपूरची संत्री, खान्देशची केळी, कोकणचा हापूस अशीच ओळख आपल्याला झाली आहे. तशीच जालना शहराची देखील राज्यातील स्टील सिटी अशी ओळख आहे. स्टील उद्योगाबरोबरच इथे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या फक्त तुम्हाला जालन्यातच पाहायला मिळतात.
advertisement
2/6
जालना शहरात मोठ्या प्रमाणावर स्टील कारखाने आहेत. यामुळे राज्यभरात जालन्याला स्टील सिटी अशी ओळख आहे. जालना शहरात असलेल्या स्टील कारखान्यांमध्ये स्क्रॅप मधील लोखंडापासून स्टील निर्मिती केली जाते.
advertisement
3/6
स्टील उद्योगाबरोबरच जालना शहर बियाणे उद्योगामध्ये आघाडीवर आहे. तंत्रशुद्ध बियाणे निर्मितीच्या विविध कंपन्या जालना शहरात आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये बियाण्यांचा पुरवठा जालना मधूनच होतो. राज्याबरोबरच देशातील इतर भागांमध्ये देखील बियाणे जालन्यातून निर्यात केले जाते.
advertisement
4/6
आध्यात्मिक दृष्टिकोनातून राजुर गणपती मंदिर हे जालना शहरातील नागरिकांचे आराध्य दैवत आहे. जालना शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांबरोबरच राज्यातील विविध भागातून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
advertisement
5/6
खाद्य संस्कृती बद्दल बोलायचं झाल्यास जालन्यामध्ये वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत. मात्र त्यातल्या त्यात सांगायचे झाल्यास जालन्यात मिळणारा पारा हा राज्यामध्ये इतर कुठेही मिळणार नाही. दुधाला आटवून त्यामध्ये ड्रायफूट टाकून शरीराला अतिशय हेल्दी असणारा पारा तयार केला जातो.
advertisement
6/6
जालना जिल्ह्यात शेती आणि शेतीपूरक उद्योगांना देखील पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. राज्यातील पहिली रेशीम बाजारपेठ जालना शहरात सुरू झाली आहे. त्यामुळे रेशीम कोशांची मोठ्या प्रमाणावर खरेदी रेशीम मार्केटमध्ये होते. त्यामुळे राज्यातील रेशीम हब म्हणून जालना शहर आता उदयास येत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
स्टील उद्योग ते रेशीम हब.., या 5 गोष्टींसाठी जालना आहे फेमस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल