TRENDING:

Garib Rath Express Fire: डोळे उघडले तर आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट, गरीब रथमधून प्रवाशांनी मारल्या उड्या, थरकाप उडवणारे PHOTO

Last Updated:
अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या AC कोचमध्ये दिवाळीच्या दिवशी सरहिंद स्टेशनजवळ भीषण आग लागली, तीन कोच जळाले, जीवितहानी नाही, चौकशी सुरू.
advertisement
1/7
डोळे उघडले तर आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट,गरीब रथमधून प्रवाशांनी मारल्या उड्या
दिवाळीच्या मुहूर्तावर गालबोट लावणारी घटना घडली आहे. प्रवासी दिवानिमित्ताने जात असताना सकाळी झोपेतून उठले अन् समोर आगीच्या ज्वाळा दिसल्या. आग इतकी भयंकर होती की प्रवाशांनी अर्धवट झोपेतच जीव वाचवण्यासाठी पटापट उड्या टाकल्या. पाहताच क्षणी एक्सप्रेसमध्ये लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण केलं आणि प्रवाशांनी आग आग वाचवा वाचवा असा गोंधळ सुरू केला.
advertisement
2/7
गरीब रथ एक्सप्रेसमध्ये सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीच्या ज्वाळा भयंकर होत्या. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. यामध्ये काहीजण जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फाटक्याची ठिणगी उडावी तसंच शॉर्ट सर्किट झालं आणि नंतर आग लागली. काही प्रवाशांचा दावा आहे की इतक्या वेगानं शॉर्ट सर्किटची आग पसरणं शक्य नाही. ट्रेनमध्ये नक्कीच काहीतरी ज्वलनशील पदार्थ असावा, याची चौकशी व्हावी.
advertisement
4/7
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसमध्ये आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. ही आग AC डब्यात लागली आणि नंतर आजूबाजूच्या कोचनं पसरली. आग लागलेले डबे इतर कोचपासून वेगळे करण्यात आले आहेत.
advertisement
5/7
पंजाबच्या सरहिंद स्टेशनजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे. तीन कोच जळून खाक झाले आहेत. ही ट्रेन लुधीयानाहून दिल्लीला निघाली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
6/7
आगीचं ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीची माहिती मिळताच अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र कोचचं मोठं नुकसान झालं, लोकांमध्ये भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण होतं.
advertisement
7/7
दिवाळीच्या काळात लाखो लोक आपल्या कुटुंबांना भेटायला जात असताना रेल्वेने प्रवास करतात. अशा वेळी ही दुर्घटना घडल्याने प्रशासनासमोर रेल्वे सुरक्षा आणि देखभालीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही आग AC कोचला लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Garib Rath Express Fire: डोळे उघडले तर आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट, गरीब रथमधून प्रवाशांनी मारल्या उड्या, थरकाप उडवणारे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल