Car Accident : औसा अपघाताची करुण कहाणी; मायलेकीचं हिरावलं कुंकू, तर मातेने गमावला पोटचा गोळा, PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Car Accident : लातूर सोलापूर महामार्गावरील औसा येथील अपघाताची धक्कादायक कहाणी समोर आलीय.
advertisement
1/5

लातूर येथे शनिवारी घडलेल्या एका अपघाताने जिल्हा हादरुन गेला आहे. या भीषण अपघातात माय लेकीचं कुंकु पुसलं गेलंय तर एका मातेनं नाहक आपल्या पोटचा गोळा गमावला.
advertisement
2/5
शनिवारी सकाळच्या वेळी औसा जवळील सीएनजी पंपावरजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. लातूरकडे येणारी कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये शिरली. अचानक झालेल्या या अपघातामुळे हॉटेलमधील नाश्त्यासाठी आलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
advertisement
3/5
हा अपघात अतिशय भयानक होता. या अपघातात कार मधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. औसा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. तिघांचीही प्रकृती चिंताजनक होती. तीनही व्यक्तींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारा पाठवण्यात आले होते.
advertisement
4/5
औसा शहरात जर उड़ान पुल झाला असता तर असा अपघात झालाच नसता अशी भावना आता व्यक्त होतेय. औसा शहरात उड़ान पुल व्हावा अशी औसा वाशियांची जूनि मागणी होती, त्यानुसार उड़ान पुल मंजूर देखील झाला होता. मात्र स्थानिक राजकारणामुळे हा उड़ान पुल होउ शकला नाही. त्यामुळे औसा शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत अनेकांचे जीव गेलेत.
advertisement
5/5
एकूणच जर पाहायला गेलं तर कालचा अपघात हा फक्त दुर्दैवीच नव्हता तर काळने एका चिमुकल्यावर केलेला घात होता, कामाच्या पहिल्याच दिवशी हॉटेल काम करण्यासाठी गेलेला 14 वर्षीय ओमकार कांबळेचा देखील नाहक बळी गेला. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष्य देण्याची गरज बनली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Car Accident : औसा अपघाताची करुण कहाणी; मायलेकीचं हिरावलं कुंकू, तर मातेने गमावला पोटचा गोळा, PHOTOS