Nagar Parishad Election Results: राज्यातील एका मताने हरलेले किंवा जिंकलेले उमेदवार कोण? संपूर्ण यादी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nagar Parishad Election Election Results: रविवारी २१ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल स्पष्ट झाला. राज्यातील चार ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार एका मतांनी जिंकले.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या. पहिल्या टप्प्यात २६३ नगरपालिका संस्थांमध्ये २ डिसेंबर रोजी मतदान झाले. उर्वरित २३ नगरपरिषदा आणि काही रिक्त पदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान झाले. रविवारी २१ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल स्पष्ट झाला.
advertisement
2/5
गडचिरोलीमध्ये भाजपचे उमेदवार संजय मांडवगडे यांचा प्रभाग क्रमांक ४ मध्ये फक्त एका मताने पराभव झाला. अंतिम मतमोजणीनंतर त्यांना ७१६ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांना ७१७ मते मिळाली.
advertisement
3/5
पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीत प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या सिद्धी भोपतराव एका मताने विजयी झाल्या आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार प्रिया गंधे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला आहे
advertisement
4/5
पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत थरारक निकाल पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता राहुल ढोरे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत. आमदार सुनील शेळके यांनी सुनीता ढोरे यांचे विशेष कौतुक केले.
advertisement
5/5
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत वृषाली पांढरे यांनी काँग्रेस उमेदवाराला एका मताने पराभूत केले. काहीही झाले तरी यंदा आपण मावशीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचेच असा पण भाच्याने अन् पुतण्याने केला. काँग्रेसची तगडी फळी असतानाही पांढरे यांनी यंत्रणा कामाला लावून विजयासाठीचे डावपेच आखले. भाचा आणि पुतण्याच्या मित्रमंडळींनीही यशस्वीपणे साथ दिली. अखेर या संघर्षाचा शेवट वृषाली पांढरे यांच्या विजयाने झाला. काँग्रेसच्या फळीपुढे मावशी भाच्याची जोडी अव्वल ठरली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election Results: राज्यातील एका मताने हरलेले किंवा जिंकलेले उमेदवार कोण? संपूर्ण यादी