मराठा आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात महामार्गांवर रास्तारोको; वाहनांच्या लांब रांगा; पाहा PHOTO
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राज्यभरात सुरुवात झालीय. मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक महामार्गांवर रास्तारोको करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, नांदेड, लोणावळ्यात महामार्गांवर यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
1/7

लोणावळा - मावळ तालुका सकल मराठा समाजाकडून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील एकविरा देवीच्या कार्ला फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (गणेश दुडम)
advertisement
2/7
छ. संभाजीनगर : पाचोड पैठण मार्गावर दावरवाडी फाटा येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा बांधवांनी रस्त्यावर बसून रास्ता रोको केला यावेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. (अविनाश कानडजे)
advertisement
3/7
सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गवर बीड शहरा जवळील पाली गावात रास्ता रोको सुरू आहे..बीड- परळी राष्ट्रीय महामार्ग.. तेलगाव या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे.. (सुरेश जाधव)
advertisement
4/7
अहमदनगर - मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमदाराला पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर मध्ये एमआयडीसी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आलाय . (साहेबराव कोकणे)
advertisement
5/7
नाशिकच्या वडनेर पाथर्डी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोखळा. नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. (लक्ष्मण घाटोळ)
advertisement
6/7
नांदेड जिल्ह्यात ठीक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले . नांदेड - नागपुर , नांदेड- निर्मल , नांदेड - हैदराबाद, नांदेड- बीदर या राष्ट्रीय महामार्गासह सगळेच मार्ग मराठा आंदोलकांनी अडवले . त्यामूळे ठीक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या .. परीक्षार्थी आणि रुग्णांना मात्र रस्ता करुन दिला जात आहे. (मुजीब शेख)
advertisement
7/7
सोलापूरमध्येही मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहानंतर मराठा समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलकांनी रस्त्यात ठिय्या मारला. यामुळे वाहतूक ठप्प झाली. (प्रीतम पंडित)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मराठा आक्रमक! आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात महामार्गांवर रास्तारोको; वाहनांच्या लांब रांगा; पाहा PHOTO