Maruti Ertiga आणि Mahindra स्कॉर्पिओची समोरासमोर धडक, 4 जणांचा जागेवर मृत्यू, नाशिकमधील घटनेचे PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने सिल्वासा पेठकडून येणाऱ्या मारुती एर्टिंगाला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी)
advertisement
1/7

नाशिक जिल्ह्यातून एक अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्याजवळ मारुती सुझुकी एर्टिंगा आणि महिंद्रा स्कार्पिओ एनची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ४ जण ठार झाले आहे. तर ५ जण जखमी झाला आहे. जखमीला तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील चाचडगाव टोलनाक्याजवळ आज दुपारी ही घटना घडली.
advertisement
3/7
नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने सिल्वासा पेठकडून येणाऱ्या मारुती एर्टिंगाला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
advertisement
4/7
ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात मारुती सुझुकी एर्टिंगाचा चक्काचूर झाला आहे. तर महिंद्रा स्कार्पिओ एनच्या समोरील भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. दोन्ही वाहनांचे इंजिन हे फुटले होते.
advertisement
5/7
या भीषण अपघातात मारुती एर्टिंगा कारमधील तीन जण जागीच ठार झाले आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
6/7
तर स्कार्पिओ वाहनातील एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ५ जण जखमी झाले आहे. घटना घडल्यानंतर टोल नाक्यावरील कर्मचारी मदतीसाठी धावून आले.
advertisement
7/7
जखमींना टोल नाका वरील रुग्णवाहिका चालक मयूर यांनी तात्काळ ग्रामीण नाशिक रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maruti Ertiga आणि Mahindra स्कॉर्पिओची समोरासमोर धडक, 4 जणांचा जागेवर मृत्यू, नाशिकमधील घटनेचे PHOTOS