TRENDING:

राज ठाकरे 20 वर्षांनंतर संजय राऊत यांच्या घरी, पाहा खास फोटो

Last Updated:
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंगळवारी संजय राऊत यांची भेट घेतली.
advertisement
1/5
राज ठाकरे 20 वर्षांनंतर संजय राऊत यांच्या घरी, पाहा खास फोटो
शिवसेनेची मुलूखमैदानी तोफ, खासदार संजय राऊत गेल्या महिन्याभरापासून दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. मुंबईतले तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळते.
advertisement
2/5
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंगळवारी संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी राज ठाकरे यांनी बुधवारी दुपारी भेट त्यांची घेतली.
advertisement
3/5
जवळपास २०-२५ मिनिटे त्यांनी संजय राऊत यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारल्या. प्रकृती सुधारते आहे, फार दगदग करू नका, प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी संजय राऊत यांना दिला.
advertisement
4/5
तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे हे शिवसेनेत असताना कुठल्याशा कामानिमित्त संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी बुधवारी राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी गेले.
advertisement
5/5
एकसंध शिवसेना असताना आणि राज ठाकरेही सेनेत असताना संजय राऊत आणि राज ठाकरे यांना विशेष दोस्ताना होता. त्यांच्या मैत्रीची पक्षात आणि पक्षाबाहेरही सतत चर्चा होत असे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना समजाविण्यासाठी संजय राऊत हे कृष्णकुंजला गेले होते. मात्र त्यावेळी भडकलेल्या राज ठाकरे समर्थकांनी राऊत यांच्या गाडीची तोडफोड करून गाडीला आग लावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
राज ठाकरे 20 वर्षांनंतर संजय राऊत यांच्या घरी, पाहा खास फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल