मुंबई गोवा महामार्गावर अपघात, अचानक रिक्षा समोर आल्याने ब्रेक दाबला, ट्रक पलटी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
advertisement
1/5

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाका परिसरात जगबुडी नदी लगतच्या वाशिष्टी डेअरी समोर आज अपघाताची घटना घडली.
advertisement
2/5
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला आयशर ट्रक वशिष्टी डेअरी समोरील डायव्हर्शनजवळ अचानक समोर आलेल्या रिक्षामुळे चालकाने तात्काळ ब्रेक मारला. यामुळे ट्रकचे बिघडल्याने रस्त्यावर पलटी झाला.
advertisement
3/5
या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
advertisement
4/5
सध्या या लेनवरून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महामार्ग विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आयशर ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे.
advertisement
5/5
अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुंबई गोवा महामार्गावर अपघात, अचानक रिक्षा समोर आल्याने ब्रेक दाबला, ट्रक पलटी