काचा फुटल्या, बोनेटचा चक्काचूर; मुलुंड टोलनाक्यावर एकामेकांना धडकल्या 5 गाड्या, घटनास्थळावरचे PHOTO
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुलुंडच्या टोलनाक्याजवळ विचित्र अपघात झाला. एका मागोमाग एक गाड्या धडकल्याने गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
1/5

मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता. पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. असे असताना मुलुंडच्या टोलनाक्याजवळ विचित्र अपघात झाला.
advertisement
2/5
चार ते पाच गाड्या एकमेकांना धडकल्या. एका मागोमाग एक गाड्या धडकल्याने गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गाड्यांची दर्शनी भाग आणि मागील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आलेल्या चित्रफितीत दिसत आहे.
advertisement
3/5
एका एसयूव्ही कारचा दर्शनी भाग पूर्णत: चेंबलेला होता. पुढील कारने अचानक ब्रेक मारल्याने मागील गाडी जाऊन धडकली. अशा विचित्र अपघातात जवळपास पाच गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
advertisement
4/5
अपघातानंतर अनेक गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने जवळपास अर्धा तास मुलूंडच्या टोलनाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून पोलिसांनी काही वेळात वाहतूक कोंडी फोडली.
advertisement
5/5
या अपघातात काहींना किरकोळ जखमा आहेत. परंतु सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
काचा फुटल्या, बोनेटचा चक्काचूर; मुलुंड टोलनाक्यावर एकामेकांना धडकल्या 5 गाड्या, घटनास्थळावरचे PHOTO