TRENDING:

पाऊस थांबला, आता थंडीचा तडाखा, विदर्भाचा पारा घसरला!

Last Updated:
विदर्भात थंडीचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यासोबतच ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांचे तुर पिकाचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. 
advertisement
1/5
पाऊस थांबला, आता थंडीचा तडाखा, विदर्भाचा पारा घसरला!
गेले काही दिवस राज्यात कोरडे हवामान बघायला मिळत आहे. तर काही ठिकाणी आता गुलाबी थंडी जाणवायला सुरवात झाली आहे. विदर्भातही आता कोरडे वातावरण असून पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे.
advertisement
2/5
विदर्भात रविवारी सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला. आज 4 नोव्हेंबरला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असणार, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे.
advertisement
3/5
नागपूरमध्ये आज धुक्यासह ढगाळ आकाश राहून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. विदर्भातील किमान तापमान रविवारी 19 अंश सेल्सिअस इतके होते. त्यामुळे आता थंडीचा जोर वाढला असून पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवायला सुरवात झाली आहे.
advertisement
4/5
तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा बघायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे. थंडी आणि ढगाळ वातावरण यामुळे तूर पिकांत अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यांत आंतरपीक म्हणून तुरीचे पिकं घेतले जाते. त्या पिकाच्या नुकसानीस आता सुरवात झाली आहे.
advertisement
5/5
त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधी सोयाबीन पिकाचे नुकसान त्यातही भाव कमी, आता तुरीचे पिकं सुद्धा हातून जाणार का? अशी भीती शेतकऱ्याच्या मनात आहे. थंडीचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी आता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
पाऊस थांबला, आता थंडीचा तडाखा, विदर्भाचा पारा घसरला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल