TRENDING:

विदर्भात थंडीचा जोर कायम, नागपुरात पारा घसरलेलाच, पाहा आजचं हवामान अपडेट

Last Updated:
विदर्भात गेले 3 दिवस थंडीचा कडाका कायम आहे. विदर्भातील नागपूरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद केल्या गेली आहे. 5 जानेवारीला विदर्भात सर्वत्र कोरडे वातावरण राहणार असून थंडीचा जोर वाढलेला असणार आहे.
advertisement
1/5
विदर्भात थंडीचा जोर कायम, नागपुरात पारा घसरलेलाच, पाहा आजचं हवामान अपडेट
राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर वाढलेला दिसून येत आहे. 4 जानेवारीला विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद केल्या गेली होती. मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणी थंडीचा जोर वाढलाय. विदर्भात गेले 3 दिवस थंडीचा कडाका कायम आहे. विदर्भातील नागपूरमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद केल्या गेली आहे. 5 जानेवारीला विदर्भात सर्वत्र कोरडे वातावरण राहणार असून थंडीचा जोर वाढलेला असणार आहे.
advertisement
2/5
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 5 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नागपूरमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके राहणार असून त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
advertisement
3/5
गोंदियातील किमान तापमान देखील पुढील काही दिवस कायम असणार आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे. अकोला जिल्ह्यातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
तर बुलढाणा आणि गडचिरोली जिल्ह्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी सुद्धा मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. येथील किमान तापमान देखील पुढील काही दिवस स्थिर असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर वाशिम जिल्ह्यातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
विदर्भातील सर्व जिल्ह्यातील किमान तापमानात घट बघायला मिळत आहे. मात्र, वाशिममधील किमान तापमान गेले काही दिवस स्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यांत थंडीचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. विदर्भात थंडीचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांची पिकांची आणि सर्व नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात थंडीचा जोर कायम, नागपुरात पारा घसरलेलाच, पाहा आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल