TRENDING:

नागपूर, अमरावतीमध्ये तापमानाचा पारा वाढणार, विदर्भातील आजचा हवामान अंदाज पाहिला का?

Last Updated:
विदर्भातील दोन जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढणार आहे. तुरळक जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 
advertisement
1/5
नागपूर, अमरावतीमध्ये तापमानाचा पारा वाढणार, विदर्भातील हवामान अंदाज पाहिला का?
राज्यात सध्या काही ठिकाणी उकाडा जाणवत आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. हवामानातील या विचित्र बदलामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागणार आहे. विदर्भात सध्या काही जिल्ह्यांत प्रचंड उकाडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
advertisement
2/5
रविवारी विदर्भातील वातावरण कोरडे असून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळाला. आज 28 ऑक्टोबरला विदर्भातील अमरावती, नागपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढलेलं असणार आहे. तर चंद्रपूर, वर्धा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/5
नागपूरमध्ये आज 29 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी गुलाबी थंडी जाणवत आहे.
advertisement
4/5
वातावरणात झालेले हे बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. त्याचबरोबर शेतात असलेल्या पिकांवर सुद्धा याचा परिणाम होण्यास सुरवात झाली आहे. कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आधीच झाला होता. त्यात थंडीमुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
दिवाळीमध्ये कपाशी पिकाची वेचणी सुरू होते. या वर्षी अनेकांच्या कपाशी अजूनही काढलेल्या नाहीत. एक संकट टळलं की दुसरं तयार असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
नागपूर, अमरावतीमध्ये तापमानाचा पारा वाढणार, विदर्भातील आजचा हवामान अंदाज पाहिला का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल