विदर्भात आज 2 जिल्ह्यांत धो धो बरसणार, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोरा आहे. आज पुन्हा विदर्भातील काही ठिकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात परतीच्या मान्सूनचा जोर आहे. विदर्भातही मागील आठवड्यात सातत्याने यलो अलर्ट राहिला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
advertisement
2/5
राज्यात आता पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 28 सप्टेंबर रोजी विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर काही ठिकाणी हलका सूर्यप्रकाश होता.
advertisement
3/5
29 सप्टेंबरला सुद्धा पावसाची स्थिती कायम राहणार आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, अमरावती या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/5
नागपूर शहरात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त असणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
दरम्यान, वादळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर आठवडाभर अचानक येणाऱ्या पावसानं शेतकरी हैराण झाला होता. आता हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा दिलीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भात आज 2 जिल्ह्यांत धो धो बरसणार, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती?