Vidarbha Weather : विदर्भात उष्णतेची लाट, तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट, पाहा आजचं हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हवामान विभागाच्या माहितीनुसार, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा कायम असून,आज 21 एप्रिल रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
advertisement
2/7
हवामान विभागाच्या माहितीनुसार, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/7
एप्रिल महिन्यातच 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर मे महिन्यात सुर्य आग ओकणार का? अशी भीती नागरिकांच्या मनात येत आहे. चंद्रपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, सर्वाधिक उष्णतेचा कडाका येथील नागरिकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
त्याचबरोबर अकोला आणि अमरावती येथील कमाल तापमान अनुक्रमे 45 आणि 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसून येत आहे.
advertisement
5/7
दुपारच्या वेळी नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. याबरोबरच आरोग्याची काळजी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
6/7
दरम्यान, नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 40 अंशांपेक्षा अधिक असून, मुख्यतः निरभ्र आकाश असल्यामुळे उन्हाचा तीव्र चटका बसत आहे. नागपूरमध्ये 45 अंश, वर्धा आणि यवतमाळमध्ये अनुक्रमे 44 अंश, तर गोंदिया आणि बुलढाणा येथे 41 आणि 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
7/7
हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे, हलके आणि सूती कपडे परिधान करावेत, असा सल्ला दिला जात आहे. पुढील दोन दिवस विदर्भात अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather : विदर्भात उष्णतेची लाट, तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट, पाहा आजचं हवामान अपडेट