Nagpur Weather: विदर्भासाठी धोक्याची घंटा! वादळी पाऊस अन् गारपीट होणार, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात उष्णतेच्या लाटेनंतर हवामानाचं दुसरं संकट आलं आहे. आज काही ठिकाणी गारपीट तर 6 जिल्ह्यांना वादळी पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

एप्रिल महिन्यात विदर्भातील तापमानात मोठी वाढ झालेली दिसून आली. आता मे महिन्याच्या सुरवातीला विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी मध्यरात्री विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस झाला.
advertisement
2/7
आज 5 मे रोजी विदर्भातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्याशा पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया या भागांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांत कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 27 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
बुलढाणा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. अकोला जिल्ह्यातही काहीशी तशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र आकाश निरभ्र राहील.
advertisement
5/7
दुसरीकडे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असू शकते. येथे गारपीट होण्याची शक्यता असून जोरदार पाऊसही पडू शकतो. त्यामुळे या दोन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
हवामान विभागाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली थांबू नये, मोबाइलचा वापर टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
7/7
विदर्भात गारपीटसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनीही हवामानाच्या अंदाजानुसार शेतीच्या कामात बदल करावा. कारण वादळी वारे आणि पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. फळगळ होणे, पिकांची नासाडी होणे यासारखे प्रकार घडू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: विदर्भासाठी धोक्याची घंटा! वादळी पाऊस अन् गारपीट होणार, आजचा हवामान अंदाज