नांदेडमध्ये घातपाताचा कट? प्रतिबंधित LMG बंदुकीच्या 436 गोळ्या सापडल्याने खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
प्रतिबंधित शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, दहशतवादविरोधी पथक, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/5

नांदेड शहराजवळच्या पावडेवाडी गावाजवळ बंदुकीच्या गोळ्याचा मोठा साठा सापडला आहे . त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
2/5
शनिवारी (1 जून) रात्री पावडेवाडी येथील आकाश पावडे या युवकाला गावाजवळच्या एका नाल्यात बंदुकीच्या गोळ्याचा एक पट्टा सापडला.
advertisement
3/5
युवकाने तो पट्टा घरी नेला. गोळ्या पाहून कुटुंबीयांनी पोलीसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हा 390 गोळ्याचा साठा पोलिसांना सापडला.
advertisement
4/5
रविवारी (2 जून) सकाळी पुन्हा बॉम्बशोधक पथकाला 45 गोळ्या सापडल्या. एकूण 436 गोळ्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
advertisement
5/5
या गोळ्या लाईट मशीन गनच्या आहेत. प्रतिबंधक शस्त्र असलेल्या एलएमजी ही बंदूक प्रतिबंधक शस्त्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
नांदेडमध्ये घातपाताचा कट? प्रतिबंधित LMG बंदुकीच्या 436 गोळ्या सापडल्याने खळबळ