Wether Alert: सावधान! खान्देशात 48 तासांसाठी हायअलर्ट, नाशिकसह या जिल्ह्यांत गारपीट होणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Weather Alert: उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज नाशिक, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांत गारपीट अन् वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

गेल्या काही काळात उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मंगळवारी काही भागात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यानंतर आज पुन्हा हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. नाशिक, जळगावसह काही काही जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
2/5
उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
advertisement
3/5
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. आता पुढील 3 दिवसांसाठी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
4/5
उत्तर मध्य महाराष्ट्रातील पुढील 3-4 दिवस हवामानाची हीच स्थिती कायम असणार असून या काळात गारपीट आणि वादळी पावसाने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र हवामान कोरडे राहील आणि तापमानाची तीव्रता पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, सतत बदलणारे हवामान आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी देखील विजांच्या कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Wether Alert: सावधान! खान्देशात 48 तासांसाठी हायअलर्ट, नाशिकसह या जिल्ह्यांत गारपीट होणार