Navratri Fast : नवरात्रीत 9 दिवस असे करा उपवास, जाणून घ्या सोप्या टीप्स
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. नवरात्रामध्ये अनेक जण मनातील इच्छा- अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी देवीची आराधना करून उपवास करतात. काही जण फक्त घट बसताना आणि उठताना उपवास ठेवतात, तर काही जण सलग नऊ दिवस उपवास करतात. नवरात्र उत्सवात सलग नऊ दिवस उपवास करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपवास करण्यास धार्मिक मान्यता आहे. तुम्हाला माहितीये का, सलग उपवास केल्यामुळे शरीरालाही अनेक फायदे होतात.
advertisement
1/8

शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. नवरात्रामध्ये अनेक जण मनातील इच्छा- अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी देवीची आराधना करून उपवास करतात. काही जण फक्त घट बसताना आणि उठताना उपवास ठेवतात, तर काही जण सलग नऊ दिवस उपवास करतात.
advertisement
2/8
नवरात्र उत्सवात सलग नऊ दिवस उपवास करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपवास करण्यास धार्मिक मान्यता आहे. तुम्हाला माहितीये का, सलग उपवास केल्यामुळे शरीरालाही अनेक फायदे होतात.
advertisement
3/8
सलग नऊ दिवस उपवास केल्यामुळे शरीरात काय बदल होतात? यामुळे वजन कमी होते की अशक्तपणा येतो? असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर या प्रश्नाबद्दल सांगणार आहोत. एनसीबीआयच्या मते, ‘उपवासामुळे वजन कमी होते. शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. तसेच टाईप 2 मधुमेहापासून संरक्षण होते.’
advertisement
4/8
न्युट्रिशनिस्ट यामी अग्रवाल यांच्या मते, ‘उपवासात अनेकजण कमी तेलकट पदार्थ खातात. गोड पदार्थ कमी खातात. या काळात रोजच्या तुलनेत जास्त फळे खाण्यात येतात. असा आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. उपवास करताना केवळ फळांचा आहार घेतल्यास शरीरातील हायड्रेशन पातळीही वाढते.’
advertisement
5/8
तज्ज्ञांच्या मते, ‘उपवास केल्यामुळे चांगली झोप येते. यामुळे केवळ शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होत नाही, तर मनालाही फायदा होतो. उपवास काळात तळलेले आणि स्निग्ध पदार्थ खाण्याचे टाळल्यास मनामध्ये सकारात्मक भावना जागृत होते. तणाव कमी होतो. निरोगी मन आणि तणाव कमी झाल्याने चांगली झोप लागते.’
advertisement
6/8
जयपूरमधील क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट मेधावी गौतम यांनी सांगितलं की, ‘जेव्हा तुम्ही उपवास करता, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करीत असता. कारण आजकाल अनेकांना जास्त कॅलरी, तेलकट आणि जंक फूड खाणं आवडतं. पण असं अन्न खाल्ल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.
advertisement
7/8
न्यूट्रिशनिस्ट यामी अग्रवाल यांच्या मते, ‘पण जर तुम्ही उपवास केला, तर तुमच्या पचनसंस्थेला एकप्रकारे विश्रांती मिळते. तसेच तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. सलग नऊ दिवस उपवास करताना सात्विक अन्न खाल्ल्यानं डिटॉक्सिफिकेशन होते. ज्यामुळे पोट आणि त्वचेला फायदा होतो.’
advertisement
8/8
जर तुम्ही उपवास केला तर तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. कारण उपवास केल्यानं शरीरामध्ये प्रतिरोधक पेशी तयार होतात. ऋतू बदलल्यानंतर अनेकदा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. परंतु जर तुम्ही उपवास केला, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही विषाणूजन्य आजार, ताप किंवा खोकला, सर्दीपासून स्वतःचं संरक्षण करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Navratri Fast : नवरात्रीत 9 दिवस असे करा उपवास, जाणून घ्या सोप्या टीप्स