Nilesh Rane: भाजप कार्यकर्त्याच्या बेडरूममध्ये निलेश राणेंची धाड, समोरचं दृश्य पाहून डोळे विस्फारले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
विजय केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाही असा आरोप निलेश राणेंनी केला.
advertisement
1/7

कणवली नगर परिषदेच्या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपकडून पैसे वाटप केलं जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला आहे.
advertisement
2/7
मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये सापडले आहेत.
advertisement
3/7
विजय केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाही असा आरोप निलेश राणेंनी केला. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी काळा पैसा वापरण्याचा प्रकार सुरू असून, हा त्याचाच पुरावा आहे, असा दावा राणे यांनी केला आहे.
advertisement
4/7
आपला मोबाईल कॅमेरा सुरू ठेवत घरातील दृश्ये थेट प्रसारित केली, ज्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात पैशाची बॅग आढळून आली आहे.
advertisement
5/7
पोलिसांकडून पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे प्राथमिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
6/7
निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप भाजप पदाधिकाऱ्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
advertisement
7/7
ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली जाणार असल्याचेही सांगण्यात येत असून, या प्रकरणावर आयोग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Nilesh Rane: भाजप कार्यकर्त्याच्या बेडरूममध्ये निलेश राणेंची धाड, समोरचं दृश्य पाहून डोळे विस्फारले