TRENDING:

Imran Khan Bollywood: बॉलिवूडच्या 3 हिरोईन्सनी इमरान खानला लावलं होतं वेड, एकीशी करणार होता लग्न, कोण आहेत त्या?

Last Updated:
Imran Khan: इमरान खान त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त अनेक दशकांपासून त्यांच्या महिलांसोबतच्या संबंधांमुळेही सतत हेडलाईन्समध्ये राहिले आहेत. इमरान खान यांचे नाव अनेक बॉलिवूड दिवांसोबत जोडले गेले होते.
advertisement
1/9
बॉलिवूडच्या 3 हिरोईन्सनी इमरान खानला लावलं होतं वेड, एकीशी करणार होता लग्न
मुंबई: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि एकेकाळचे क्रिकेट स्टार इमरान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद आहेत. गेल्या २१ दिवसांपासून त्यांच्या तीन बहिणींना त्यांची भेट घेण्याची परवानगी न मिळाल्याने, इमरान यांच्या आरोग्याबद्दल आणि ते नेमके कुठे आहेत, याबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
advertisement
2/9
कोर्टाने परवानगी देऊनही तुरुंग प्रशासन भेट नाकारत असल्याने इमरान खान यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या बहिणींनी पंजाब प्रांताच्या आयजीकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
advertisement
3/9
तुरुंग प्रशासन किंवा सरकारकडून इमरान खान यांच्या आरोग्याची नेमकी स्थिती आणि ते कुठे आहेत, याबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाहीये, असा त्यांचा मुख्य आरोप आहे. या गूढतेमुळे त्यांची तब्येत ठीक नसल्याच्या अफवांना बळ मिळत आहे.
advertisement
4/9
इमरान खान त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीव्यतिरिक्त अनेक दशकांपासून त्यांच्या महिलांसोबतच्या संबंधांमुळेही सतत हेडलाईन्समध्ये राहिले आहेत. इमरान खान यांचे नाव अनेक बॉलिवूड दिवांसोबत जोडले गेले होते.
advertisement
5/9
त्यावेळी इम्रान खान आणि बंगाली अभिनेत्री मूनमून सेन यांच्यातील जवळीकतेनेही खूप लक्ष वेधले होते. असे म्हटले जात होते की इम्रानला मूनमून सेन आवडत होती.
advertisement
6/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडची दिवा झीनत अमान यांच्यासोबत त्यांचे प्रेमप्रकरण खूप गाजले होते. एका पार्टीत त्यांची भेट झाली आणि त्यानंतर लंडनमध्येही ते भेटत असल्याच्या चर्चा होत्या. १९७९ मध्ये जेव्हा पाकिस्तानची टीम भारतात होती, तेव्हा इमरान खान यांनी त्यांचा २७ वा वाढदिवस झीनत अमानसोबत साजरा केल्याचे बोलले जाते.
advertisement
7/9
मात्र, झीनत अमान यांना भारत सोडायचा नव्हता, त्यामुळे त्यांचे नाते पुढे गेले नाही आणि दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.
advertisement
8/9
झीनत खान यांच्याशिवाय इमरान खान यांचे नाव एव्हरग्रीन ब्युटी रेखा यांच्यासोबतही जोडले गेले होते आणि त्यांचे नाते तर लग्नाच्या जवळ पोहोचले होते. 'स्टार' नावाच्या वृत्तपत्रातील एका बातमीची हेडलाईन होती, "रेखा-इमरान टू वेड, हिज इनस्विंग परफेक्‍टेड." या बातमीनुसार, इमरान खान सुमारे एक महिना मुंबईत राहिले होते.
advertisement
9/9
त्यांना रेखासोबत समुद्रकिनारी, नाईटक्लब आणि अगदी रेखा यांच्या घरीही अनेकदा पाहिले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, रेखा यांच्या आईला तर इमरान खान जावई म्हणून खूप आवडले होते आणि त्यांनी त्यांच्या लग्नाला संमतीही दिली होती. मात्र, काही काळानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Imran Khan Bollywood: बॉलिवूडच्या 3 हिरोईन्सनी इमरान खानला लावलं होतं वेड, एकीशी करणार होता लग्न, कोण आहेत त्या?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल