TRENDING:

सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी खुशखबर! येत्या गुढीपाडव्याला खरेदी करा बाप्पाचे अलंकार

Last Updated:
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यानं तो अत्यंत शुभ दिवस मानला जातो. याच दिवसापासून मराठी नववर्ष सुरू होतं आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होते. यंदाचा गुढीपाडवा आणखी खास आहे. कारण या दिवशी एकाच वेळी विविध शुभ योग निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या लाडक्या भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. (नारायण काळे, प्रतिनिधी / मुंबई)
advertisement
1/5
सिद्धिविनायक मंदिराकडून खुशखबर! गुढीपाडव्याला खरेदी करा बाप्पाचे अलंकार
कोणतंही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी आपण बाप्पाला साकडं घालतो. त्याच्याच आशीर्वादाने हाती घेतलेलं काम पार पाडतो. मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरहून भाविक येतात. आता नववर्षाच्या मुहूर्तावर या बाप्पाला अर्पण करण्यात आलेले अलंकार भाविकांना खरेदी करता येणार आहेत.
advertisement
2/5
गुढीपाडव्याच्या दिवशी लहानशी का होईना पण एक सोन्याची किंवा चांदीची वस्तू खरेदी केल्यास आपली भरभराट होते अशी मान्यता आहे. अशात बाप्पाचे दागिने घरी आणले तर सुख आपल्या दारी चालून येईल यात काही शंका नाही. 
advertisement
3/5
नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये बाप्पाला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून यात हार, साखळी, नाणी, वळ, माळ, इत्यादी अलंकार असणार आहेत. सर्व भाविकांना या लिलावामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. 
advertisement
4/5
विशेष म्हणजे एका बाजूला श्री सिद्धीविनायक मंदिराची प्रतिकृती आणि दुसऱ्या बाजूला बाप्पाची प्रतिमा असलेली 11 ग्रॅम, 21 ग्रॅम, 51 ग्रॅम 999.99 शुद्धता असलेली चांदीची नाणीही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. 
advertisement
5/5
दरम्यान, यंदाचा गुढीपाडवा सर्वच बाजूंनी विशेष आहे. एकीकडे आदल्या दिवशी सुरू होणारं सूर्यग्रहण आणि दुसरीकडे या दिवशी जुळून येणारे शुभ योग, यामुळे यंदा हा दिवस अधिक खास असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी खुशखबर! येत्या गुढीपाडव्याला खरेदी करा बाप्पाचे अलंकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल