TRENDING:

सर्वसामान्यांना रडवणार कांदा! निर्यात बंदी उठताच बाजार समितीत कांद्याच्या दरात उसळी, शेतकरी आनंदी

Last Updated:
Onion Price Hike: कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे आता रोजच्या वापरातील कांदा सर्वसामान्यांना पुन्हा रडवणार आहे.
advertisement
1/6
सर्वसामान्यांना रडवणार कांदा! निर्यात बंदी उठताच कांद्याची उसळी, शेतकरी आनंदात
जळगाव : कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली होती, त्यावेळी कांद्याचे दर नियंत्रणात होते. मात्र कांद्यावरील निर्यात खुली होताच कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आज चाळीसगाव बाजार समितीत काद्यांच्या सरासरी भावात क्विंटल मागे तब्बल 550 रुपयांची वाढ झाली. तर किरकोळ बाजारातही किलो मागे 5 ते 10 रुपयांची वाढ झाली.
advertisement
2/6
कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर येत्या काळात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरीही सर्वसामान्यांना मात्र याचा फटका बसणार आहे.
advertisement
3/6
केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं.
advertisement
4/6
निर्यात बंदी झाल्याने कांद्याचे दर किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये किलो, तर घाऊक बाजारात सरासरी 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत उतरले होते. त्यामूळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली होती.
advertisement
5/6
31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं होतं. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. शेतकऱ्यांमधील वाढता रोष पाहून केंद्राने 31 मार्चपर्यंत लादलेली निर्यात बंदी 42 दिवस आधीच उठवली.
advertisement
6/6
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने रविवारी हा निर्णय घेतला. तीन लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणार असून 50 हजार टन कांदा बांगलादेशातूनही आयात केला जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
सर्वसामान्यांना रडवणार कांदा! निर्यात बंदी उठताच बाजार समितीत कांद्याच्या दरात उसळी, शेतकरी आनंदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल