TRENDING:

Maharashtra Weather: राज्यातून पाऊस गायब; काही जिल्ह्यांतील तापमानात वाढ 

Last Updated:
13 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही. मात्र, कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागू शकतात. सोलापूर, चंद्रपूर आणि अमरावती या तीन जिल्ह्यांत 34 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याची नोंद आहे. पाहुयात, 13 ऑक्टोबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील?
advertisement
1/6
राज्यातून पाऊस गायब; काही जिल्ह्यांतील तापमानात वाढ 
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश किमान नोंदवले जाण्याचा अंदाज आहे.
advertisement
2/6
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आह. पुणे येथे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान 19 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान 18 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
advertisement
4/6
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही पावसाची शक्यता नाही. नाशिकमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नाशिकमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नागपूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
advertisement
6/6
एकूणच, 13 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी उन्हाचे चटके तर काही जिल्ह्यांत रात्रीच्या वेळी हलकी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maharashtra Weather: राज्यातून पाऊस गायब; काही जिल्ह्यांतील तापमानात वाढ 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल