उद्धव-राज ठाकरे भेटीचे फोटो समोर, बारशाच्या कार्यक्रमातील खास क्षण
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित फोटोदेखील काढला. यावेळी राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य ठाकरे उभे राहिले होते.
advertisement
1/7

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले
advertisement
2/7
संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या आधीच निघाले होते. तिथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मातोश्रीवर ते पोहोचले. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवर गेले आणि दोन्ही नेत्यांमध्ये ४० मिनिटे चर्चा झाली
advertisement
3/7
संजय राऊत यांच्या नातवाचा आज नामकरण सोहळा होता. या कार्यक्रमात राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह पोहचले होते.
advertisement
4/7
उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दाखल झाले. कार्यक्रमात उद्धव आणि राज यांच्यात काही वेळ चर्चाही झाली.
advertisement
5/7
बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित फोटोदेखील काढला. यावेळी राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य ठाकरे उभे राहिले होते.
advertisement
6/7
या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या, यावेळी संजय राऊतांसह इतर सहकाऱ्यांसोबत गप्पा मारताना, हसतानाचे फोटो समोर आले आहेत.
advertisement
7/7
गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू सातत्याने भेटीगाठी वाढवत असल्याचे दिसून येते. त्यानुसार, गेल्या 3 महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 5 वेळा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
उद्धव-राज ठाकरे भेटीचे फोटो समोर, बारशाच्या कार्यक्रमातील खास क्षण