Sanjay Raut: महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला...''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanaj Raut on Health : संजय राऊत आज काय बोलणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पहिल्यांदाच आजारपणाबद्दल भाष्य केले.
advertisement
1/7

प्रकृती अस्वास्थामुळे मागील महिनाभरापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ते सत्ताधाऱ्यांवर भाष्य केले.
advertisement
2/7
संजय राऊत यांनी मागील आठवड्यातच आजच्या पत्रकार परिषदेबद्दल सांगितले होते. त्यामुळे राऊत आज काय बोलणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
advertisement
3/7
आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी आजारपणावर पहिल्यांदाच भाष्य केले. तब्येत सुधारत असली त्याला वेळ लागत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
advertisement
4/7
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे, प्रकृतीबाबत विचारपूस करतात. आता ही त्यांची परवानगी नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
advertisement
5/7
सध्या माझी प्रकृती बरी असली तरी उपचार सुरू आहेत. आजारापेक्षा उपचार कठोर असतात. मला खत्री आहे डिसेंबर नंतर मी पूर्ण बरं होईल असे राऊत यांनी म्हटले.
advertisement
6/7
आजाराबद्दल भाष्य करताना संजय राऊत यांनी म्हटले की, तुरुंगात असतानाच आजाराची लागण झाली होती. माझ्याकडून त्यावेळी काहीसं दुर्लक्ष झाले असे संजय राऊत यांनी म्हटले. विरोधकांना तुरुंगात डांबण्यास सत्ताधाऱ्यांना आनंद वाटतो असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
advertisement
7/7
आजारपणाच्या काळात प्रकृती विचारपूस केल्याबद्दल संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरून चौकशी करून सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिल्याचे राऊत यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sanjay Raut: महिनाभरानंतर समोर आले, संजय राऊत आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलले, ''याची लागण मला...''