TRENDING:

अर्धा एकरातून सुरुवात, आज 17 एकरची स्वत:ची जमीन, वर्षाला लाखो रुपयांची कमाई, दिव्यांग शेतकऱ्याची अनोखी गोष्ट!

Last Updated:
साताऱ्यातील नागठाणे गावचे सुपुत्र मनोहर साळुंखे हे दिव्यांग आहेत. मात्र, तरीही एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. मोहन साळुंखे यांनी आपल्या वडिलांकडून अवघ्या अर्धा एकर क्षेत्रात सुरू केलेली शेतीचा व्यवसाय आज 17 एकर शेतीवर जाऊन पोहोचला आहे. कष्ट करण्याची तयारी असल्याने ते आपल्या शेतामध्ये फळबाग, फुलबाग, पालेभाज्या याचे उत्पादन घेऊन वर्षाला लाखो रुपये कमावत आहे. आज आपण जाणून घेऊयात, त्यांची प्रेरणादायी कहाणी. (शुभम बोडके/सातारा, प्रतिनिधी)
advertisement
1/9
अर्धा एकरातून सुरुवात, आज 17 एकरची स्वत:ची जमीन, वर्षाला लाखो रुपयांची कमाई...
मागील 40 वर्षांपासून मनोहर साळुंखे हे शेती करत आहेत. शिक्षण घेत असतानाही ते लहानपणी आई-वडिलांसोबत शेतात जाऊन काम करायचे. मनोहर यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे आई-वडील पारंपारिक पद्धतीने वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्य, कडधान्य, त्याचबरोबर गुरांना चारा मिळेल, अशी शेती करायचे. पण याशिवाय या शेतीतून कुटुंबाला कोणताही फायदा होत नव्हता. त्यामुळे शेतीमध्ये आपण कुठेतरी चुकत आहोत, असा अनुभव त्यांनी शेतीत बदल केले.
advertisement
2/9
आई-वडिलांच्या मते मनोहर साळुंखे यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. पायांना दिव्यांगत्व असल्याने आई-वडिलांना त्यांची काळजी होती. ते शेती करण्याची इच्छा व्यक्त करत असल्याने त्यांना मनोहर शेती कसे करणार? त्यांना शेती करता येणार का, असे अनेक प्रश्न पडायचे. त्यामुळे आई-वडिलांनी मनोहर साळुंखे यांनी शेती करण्यास विरोध दर्शवला होता. पण मी नोकरी करणार नाही आणि शेतीच करणार, असे मनोहर यांनी ठरवले होते.
advertisement
3/9
त्यामुळे त्यांनी आई-वडिलांच्या मागे लागून अर्धा एकर शेती करण्यास घेतली. मी जे शेतीतून उत्पादन घेत आहे, ते योग्य रीतीने झाले, चांगले उत्पन्न मिळाले तर सर्व मिळून आपण माझ्याप्रमाणेच शेतात लागवड करू, अन्यथा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण करीन आणि नोकरी करेल, असे त्यांनी आई-वडिलांना सांगितले. यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे म्हणणे ऐकले.
advertisement
4/9
आई-वडिलांकडून हट्ट करून अर्धा एकर शेती घेतल्यानंतर त्यांचा नवा प्रवास सुरू झाला. शेतामध्ये त्यांनी पालेभाज्यांची लागवड केली. अर्धा एकर शेतात मेथी, कोथिंबीर, तांदळाचे उत्पादन घेतले. माल घेऊन ते साताऱ्यास विक्रीसाठी येऊ लागले. चांगले पैसेही मिळू लागले त्यातून त्यांनी कोबीची उत्पादन घेतले. उंब्रज, सातारा, नागठाणे येथील बाजारात स्वतः विकू लागले. यातून त्यांना आणखी चांगला नफा मिळाला.
advertisement
5/9
हा नफा त्यांनी आई-वडिलांना दिला. त्यामुळे त्यांचाही विश्वास बसला. त्यानंतर बाकी क्षेत्रांमध्ये त्यांनी द्राक्षाची बाग घेतली. पहिल्या वर्षी थोडाफार नफा झाला. मात्र हार न मानता झालेला चुका सुधारत त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी कर्ज घेतले थोडे कर्ज काढले होते. ते वाढत जात होते. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत द्राक्षातून दुसऱ्या वर्षी वाढलेले कर्ज फेडले.
advertisement
6/9
फळ लागवड हे वर्षातून एकदाच पैसे देते. दररोज पैसे देणारे पीक आपल्या शेतात घ्यायला हवीत, असे त्यांच्या या फळबागा लागवडीतून लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजीपाला उत्पादन घेणे सुरू केले. चांगल्या गुणवत्तेची आणि विविधता आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्याचबरोबर तैवान पिंक जातीच्या पेरूचे उत्पादन घेतले. त्यांच्या या पेरुला देश विदेशातून मागणी मिळाली. त्यामुळे उत्पादनही वाढले.
advertisement
7/9
त्यानंतर आपल्या बाकी शेतकरी बांधवांसोबत एकत्र येऊन 25 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली. त्यातून चांगला फायदा मिळवला. याच फायद्यातून त्यांनी जमीन खरेदी, त्याचबरोबर शेतात लागणारे अवजारे, ट्रॅक्टर इतर मशनरी खरेदीला सुरुवात केली. शेतीतून मिळणारे उत्पादन दिवसेंदिवस वाढत गेले.
advertisement
8/9
या वाढत्या उत्पादनातून येणाऱ्या नफ्यामधून त्यांनी शेती वाढवण्याचा प्रयत्न सुरूवात केली आणि अर्ध्या एकरपासून सुरुवात केलेली शेती आता 17 एकर पर्यंत जाऊन पोहोचली. या शेतीतील माल आधी जिल्ह्यापुरता मर्यादित होता. मात्र, आता महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये त्यांच्या शेतीतील फळे, पालेभा ज्यांची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
9/9
शेतात प्रयोग करत असताना मनोहर साळुंखे यांनी इतरांना सोबत घेतले. टोमॅटोला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे हे लक्षात आल्यावर 25 एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करून टोमॅटोचे उत्पादन घेतले. यासाठी 25 शेतकऱ्यांना एकत्र आणले. हे सर्व शेतकरी एकत्र येऊन शेतामध्ये काम करू लागले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांना मजुरांना द्यावी लागणारी मजूरी वाचली. सर्व शेतकरी एकमेकांना मदत करून सर्व कामे एकत्रित करत होती. याच मदतीमुळे सर्वांना चांगला फायदा झाला. टोमॅटोच्या उत्पादनातून 25 एकरमधील शेतकऱ्यांनीही लाखो रुपयांची कमाई केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
अर्धा एकरातून सुरुवात, आज 17 एकरची स्वत:ची जमीन, वर्षाला लाखो रुपयांची कमाई, दिव्यांग शेतकऱ्याची अनोखी गोष्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल