TRENDING:

आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा, 24 तास महत्त्वाचे, पुणे, साताऱ्याला हायअलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर आज आस्मानी संकट घोंघावत असून पुणे आणि सातारा जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा, 24 तास महत्त्वाचे, पुणे, साताऱ्याला हायअलर्ट
मे महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल झाले असून आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे साताऱ्याला ऑरेंज तर सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सातारा जिल्ह्यात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. जिल्ह्यातील कमाल पारा 38 अंश सेल्सिअस तर किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यात देखील आज आस्मानी संकटाचा धोका असणार आहे. आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उन्हाचा चटका कायम असून मागील मंगळवारी 38.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्याचा पारा 37 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/7
मागील काही दिवसांपासून 45 अंशापर्यंत तापलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पारा अंशत: कमी होऊन 41.3 अंशावर राहिला. आज सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणाने तापमानात घट होणार असून हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
कोल्हापुरातील पारा 37.7 अंशापर्यंत असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमानात अंशत घट राहील. कमाल 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. आज ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट दिसून येते. मागील 24 तासात सांगलीत 37.9 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तसेच येत्या 24 तासात जिल्ह्यातील तापमान 37 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल. एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यासाठी सतर्कतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रावर आज गारपीट आणि वादळी पावसाचं संकट असणार आहे. विशेषत: पुणे आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच विजांचा धोका असल्याने नागरिकांनी देखील सुरक्षितेची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सातारा/
आजचं हवामान: पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा, 24 तास महत्त्वाचे, पुणे, साताऱ्याला हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल