Samruddhi Mahamarg: सिन्नरला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, Kia कारचा भुगा; दोघांचा मृत्यू
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महामार्गावर झालेल्या या अपघातात गाडीचा पूर्ण भुगा झाला असून जखमींवर सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
advertisement
1/7

सिन्नरला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. टायर फुटल्यामुळे किया करेन्स ही गाडी महामार्गावर उलटून ट्रकला धडकली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमीं आहेत
advertisement
2/7
या अपघातात तीन प्रौढ आणि आठ लहान मुले असे एकूण 11 जण या गाडीतून प्रवास करत होते. प्रौढांमधील एक पुरुष तर एक महिला यामध्ये दगावले आहेत.
advertisement
3/7
सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे विवाह सोहळ्यानिमित्त आलेल्या कल्याण येथील नातेवाईकांवर ही दुर्दैवी वेळ ओढवली आहे. सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात येणाऱ्या समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला.
advertisement
4/7
या अपघातात गाडीचा पूर्ण भुगा झाला असून जखमींवर सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिघांना उपचारासाठी नाशिक येथे हलवले आहे.
advertisement
5/7
दोन खाजगी बस आणि एक चार चाकीचे नुकसान झाले आहे. बालकांचा समावेश असलेल्याच गाडीला अपघात झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
6/7
एक वाजता अपघात झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरील खाजगी बस चार वाजेपर्यंत देखील जखमी पर्यंत पोहोचल्या नाहीत.
advertisement
7/7
घटनेचा अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहेत. डोक्याला इजा झालेल्या बालकांवर सिन्नर मध्ये उपचार सुरू आहेत
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Samruddhi Mahamarg: सिन्नरला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, Kia कारचा भुगा; दोघांचा मृत्यू