Solapur Fire : वेल्डिंगची ठिणगी पडली अन् अख्ख्या कारखान्याची झाली राख,आगीचे भयानक PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत सोलापूर जवळील चिंचोली एमआयडीसी येथील तुळजाई केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
advertisement
1/7

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत सोलापूर जवळील चिंचोली एमआयडीसी येथील तुळजाई केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/7
खरं तर चिंचोली एमआयडीसीला वेल्डिंगचं काम करत असताना ठिणगी पडल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
3/7
तुळजाई केमिकला लागलेली आग इतकी भीषण होती की आगीचे लोट दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत पसरले होते.
advertisement
4/7
तुळजाई केमिकल कंपनीत 80 ते 100 केमिकल युक्त ड्रम असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.याचाच स्फोट झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
5/7
ही तुळजाई केमिकल फॅक्टरी जळून पूर्ण खाक झाली आहे. या केमिकल कंपनीत सुमारे 60 ते 70 कामगार काम करत असल्याची स्थानिक नागरिकांची माहिती आहे.
advertisement
6/7
सुदैवाने कंपनीला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण कंपनीच्या यात फार मोठी आर्थिकहानी झालेली आहे.
advertisement
7/7
सोलापूर जिल्ह्यातील अग्निशामक दलाच्या विविध यंत्रणा आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग विजवण्यासाठी आठ ते दहा तासाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Solapur Fire : वेल्डिंगची ठिणगी पडली अन् अख्ख्या कारखान्याची झाली राख,आगीचे भयानक PHOTO