पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून काळजाचा ठोका चुकवणारी आणि भीतीचे वातावरण निर्माण करणारी एक थरारक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात दिवसाढवळ्या एका बिबट्याने घरासमोर बांधलेल्या बकरीवर हल्ला चढवला. एका तरुणाने हा संपूर्ण थरार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. बिबट्या बकरीला घेऊन जात असताना, त्याला हुसकावून लावणाऱ्या मुलांवरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भर दिवसा मुख्य वस्तीमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.